पाकिस्तानचा लाहौर पहिला, चीनमधील होटन दुसरा तर भारतातल्या भिवंडीचा प्रदुषणात तिसरा क्रमांक
मुंबई : जगातील सर्वाधिक प्रदुषण असणाऱ्या एकूण २० शहरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये भारतातील तब्बल १४ शहरांचा समावेश आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने हा अहवाल सादर केला आहे. हा भारतासाठी धोकादायक इशारा असून यामध्ये मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीचा समावेश आहे. यामुळे राज्याच्याही चिंतेचा हा गंभीर विषय आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स संस्थेने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन यादी प्रसिद्ध केली असून प्रदूषणामध्ये पहिल्या २० शहरांमध्ये पाकिस्तानातील लाहौर शहराचा पहिला क्रमांक आहे.
तसेच चीनमधील होटन या शहराचा दुसरा क्रमांक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील भिवंडी आणि दिल्ली हे दोन शहरे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स संस्थेच्या यादीत पाकिस्तानातील लाहोर पहिल्या क्रमांकावर तर चीनमधील होटन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील भिवंडी शहर आहे.