मिळाला एक कोटी पंचवीस लाखांचा पुरस्कार
मच्छिंद्र साळुंके
विंचूर : माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत विंचूर ग्रामपंचायतीला दहा हजार लोकसंख्यां या प्रकारात राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे १ कोटी २५ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे.
राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सरपंच सचिन रत्नाकर दरेकर, उपसरपंच प्रवीण साहेबराव चव्हाण, ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार, माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर पवार, विस्तार अधिकारी सुधाकर खंडेराव सोनवणे, मनोज बाळकृष्ण चव्हाण, किशोर जेवूघाले, वसीम तांबोळी, ज्ञानेश्वर पवार, माजी जि. प. सदस्य विलास गोरे, कैलास सोनवणे या शिष्टमंडळाने हा सन्मान स्वीकारला.