Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमाझी वसुंधरा अभियान: नगरपंचायत संवर्गात निफाडने जिंकला पावणे दोन कोटींचा पुरस्कार

माझी वसुंधरा अभियान: नगरपंचायत संवर्गात निफाडने जिंकला पावणे दोन कोटींचा पुरस्कार

निफाड : नुकत्याच झालेल्या माझी वसुंधरा स्पर्धेत निफाड नगरपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असून निफाड नगरपंचायतीला तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची पुरस्कार राशी मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ जून रोजी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव दराडे यांच्या हस्ते निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. रत्नमाला कापसे, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल चौधरी, सभापती नगरसेवक साहेबराव बेर्डे, बांधकाम सभापती किशोर ढेपले यांना सन्मानित करण्यात आले.

सदर प्रसंगी नगरपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा अभियंता भाग्यश्री सोनवणे, असिफ पठाण, देवदत्त कापसे, हर्षवर्धन मोहिते, मनोज कुंभार्डे आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -