Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीअरेरे! शिक्षणात महाराष्ट्राची अधोगती!

अरेरे! शिक्षणात महाराष्ट्राची अधोगती!

देशातील टॉप विद्यापीठाच्या यादीत विद्येचे माहेरघर पुणे १९व्या तर मुंबई ५६व्या स्थानावर!

मुंबई : शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्राची अधोगती झाली असून देशातील टॉप विद्यापीठाच्या यादीत महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर पुणे १९व्या तर मुंबई ५६व्या स्थानावर फेकले गेले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२३ म्हणजेच, देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांचे रँकिंग जारी करण्यात आले आहे. या यादीत देशातील सर्वोत्तम टॉप १० विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही.

टॉप विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ १९व्या क्रमांकावर आहे. तर मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) २३व्या क्रमांकावर आहे. तर, पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल हे या यादीत ३२व्या क्रमांकावर आहे. कधीकाळी नावाजलेले मुंबई विद्यापीठाचे स्थान ५६व्या क्रमांकापर्यंत खाली घसरले आहे.

त्यातल्या त्यात विशेष म्हणजे, देशातील इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई आयआयटीने तिसरा क्रमांक मिळवला आहे, तर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई आयआयटी (IIT Bombay) चौथ्या क्रमांकावर आहे. तर इनोव्हेशनच्या बाबतीत देशात मुंबई आयआयटीचा सातवा क्रमांक आहे. तर देशातील दंत महाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्याचा डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

देशातील टॉप विद्यापीठाच्या यादीत….

विद्यापीठ स्कोअर  क्रमांक
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे   58.19 19
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 57.07 23
सिम्बायोसिस इंटरनॅशनल  (पुणे) 53.13 32
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अॅन्ड रिसर्च 51.92 39
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे 50.62 46
नरसी मोनजी  इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, मुंबई 50.31  47
मुंबई विद्यापीठ, मुंबई 48.63  56
भारती विद्यापीठ, पुणे 43.61 91
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई 43.08 98

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -