केंद्र सरकारकडूनच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना आले आदेश
मुंबई : काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रात्रीची खलबतं सुरु असल्याची बातमी समोर आली होती. शिवसेनेच्या वर्धापनदिनाअगोदर मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलं. त्यानुसार आता वर्धापनदिनाअगोदर म्हणजेच १९ जूनआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे यंदाचा मंत्रिमंडळ विस्तार छोटेखानी असल्याची माहिती आहे. केंद्राकडूनच तसे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. उरलेल्या १३ रिक्त मंत्रिपदांचे वाटप ४-५ महिन्यांनंतर म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या विस्तारात १० मंत्र्यांनाच शपथ घेता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात ६ मंत्री भाजपचे तर ४ मंत्री शिवसेनेचे असतील, अशी प्राथमिक माहिती आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काही इच्छुक नाराज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी महामंडळाचे वाटप केले जाऊ शकते.
महामंडळाच्या वाटपासाठी काहींची नावे घेतली जात असल्याचीही माहिती मिळत आहे. पात्रता ठरवण्यासाठी माहिती मागवली जात आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे १० आमदारांनाच मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
‘यांना’ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता
भाजप व शिवसेनेतील प्रत्येकी १० आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आमदारांची नावं देखील समोर आली आहेत. भाजपकडून विदर्भ संजय कुटे, मुंबई योगेश सागर, किसन कथोरे, मनीषा चौधरी, रणधीर सावरकर, गणेश नाईक, पश्चिम महाराष्ट्र माधुरी मिसाळ, मराठवाडा मेघना बोर्डीकर, उत्तर महाराष्ट्र जयकुमार रावल, देवयानी फरांदे यांची नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
तर शिवसेना शिंदे गटाकडून कोकण योगेश कदम, भरत गोगावले, विदर्भ बच्चू कडू , संजय रायमूलकर, संजय गायकवाड, मराठवाडा संजय शिरसाट, प. महाराष्ट्र अनिल बाबर, प्रकाश आबिटकर मुंबई यामिनी जाधव, उ. महाराष्ट्र चिमणराव पाटील, सुहास कांदे यांना मंत्रिपद मिळू शकते अशी माहिती समोर येत आहे.
chndrakant patil aata pradeshdhkshy nahit te keval mantri aahet…