खळबळजनक दाव्याने सोशल मिडियावर ट्रोल
नवी दिल्ली: ओडिशाच्या बालासोर इथं शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला. या दुर्घटनेबाबत आता बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी खळबळजनक विधान केले आहे. रेल्वे अपघात दुर्घटनेचे संकेत आधी मिळाले होते असा दावा त्यांनी केला आहे.
बालासोरसारख्या दुर्घटनांची आधीच माहिती मिळते का असं पंडित धीरेंद्र शास्त्री यांना विचारण्यात आले. त्यावर धीरेंद्र यांनी काही घटनांचे संकेत मिळतात पण माहिती असणे आणि ते टाळणे हे वेगळे असते, असे म्हटले आहे. पुढे त्यांनी श्रीकृष्ण भगवानला महाभारत होणार हे माहिती होते परंतु ते टाळू शकले नाही असे सांगत रेल्वे अपघाताची जी घटना घडली तशी पुन्हा होऊ नये. जखमी लवकरात लवकरत बरे होवो अशी प्रार्थना केली.
दरम्यान, बागेश्वर बाबा यांच्या दाव्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. बाबांकडे भविष्य पाहण्याची ताकद असताना त्यांनी बालोसर रेल्वे अपघात का टाळला नाही, असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत. किंवा अपघाताबाबत आगाऊ माहिती का दिली नाही जेणेकरून अपघात टाळता येईल. त्याचप्रमाणे लोक अनेक प्रकारचे प्रश्न धीरेंद्र शास्त्री यांना विचारत आहेत.