नाना पटोले होणार का मुख्यमंत्री? बॅनरबाजीमुळे चर्चांना उधाण

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ५ जूनला असलेल्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात बॅनरबाजी करण्यात आली. यात पटोलेंचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला. काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी पटोलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ही बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याचे संकेत दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.


यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे तर शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री असे नागपुरात बॅनर्स लागले होते. आता काँग्रेसकडून नाना पटोलेंचं नाव पुढे करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीन उमेदवार भावी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. केवळ नागपूरच नव्हे तर गेल्या आठवड्यात कल्याण व आता भंडारा अशा ठिकाणीही पटोलेंच्या समर्थकांनी 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करत बॅनरबाजी केली होती.



काय म्हणाले अजित पवार?



दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या बॅनरबाजीसंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. असं कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, त्यासाठी १४५ हा जादुई आकडा उभा करावा लागतो. अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं त्यामुळे ते पोस्टर लावतात, पण शेवटी सगळं आमदारांच्या संख्येवर अवलंबून असतं, असं अजित पवार म्हणाले.


यावर नाना पटोलेंनी सौम्य शब्दांत प्रतिक्रिया दिली. "हा कार्यकर्त्यांचा एक प्रकारे उत्साह असतो. पण विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, त्यामुळे अशा पोस्टरची गरज नाही आणि असे पोस्टर लावूही नयेत, अशी मी कार्यकर्त्यांना विनंती करेन", असं नाना पटोले म्हणाले.

Comments
Add Comment

Virar crime news : सवतीचा राग अनावर! नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोवर चाकू अन् त्रिशूळने प्राणघातक हल्ला; विरारमधील धक्कादायक घटना

विरार : पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच संतापाच्या भरात एका महिलेने तिच्या सवतीवर चाकू आणि त्रिशूळने

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, संयुक्त मोजणीचे पथक माघारी

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या संयुक्त मोजणीला अवधान परिसरातील शेतकऱ्यांनी

Ramabai Ranvir : लेकींच्या शिक्षणासाठी ४७ वर्षीय आईची अनोखी जिद्द; चप्पल तुटली, अनवाणी धावली अन् ३ किमीची शर्यत जिंकली!

पुणे : मुलांच्या भविष्यासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यास तयार असते, याचं प्रेरणादायी उदाहरण पुण्यात

Jalgaon : चाळीसगावमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारने तीन महिलांना उडवले, एकीचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड

Sangli crime news : तोंडातून पांढरा फेस अन् उग्र वास; कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून एका

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेत दिवा लावून पूजा, प्रवाशावर रेल्वेची कारवाई

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेच्या डब्यात दिवा लावून धार्मिक विधी करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाई केली