तेजस्वी प्रकाशच्या ‘नागिन ६’ मध्ये ट्विस्ट

  159

ऐकलंत का! : दीपक परब



छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नागिन ६’ मध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही प्रमुख भूमिका साकारत आहे. ‘नागिन ६’मध्ये लवकरच एक ट्विस्ट येणार आहे. या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत अभिनेता वत्सल सेठ याची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे तेजस्वीसोबत वत्सल सेठ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वत्सलने तीन वर्षांसाठी मालिकांमधून ब्रेक घेतला होता. त्याने ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेमध्ये निशांत माहेश्वरी ही भूमिका साकारली होती. त्याने ‘एक हसीना थी’, ‘हासील’ आणि ‘रिश्तो का सौदागर-बाजीगर’ यांसारख्या शोमध्ये प्रमुख भूमिका साकारली. ‘नागिन ६’ व्यतिरिक्त वत्सल सेठ आगामी शो ‘तितली’मध्येही दिसणार आहे. वत्सल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वत्सल आणि त्याची पत्नी इशिता यांच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वी वत्सलने त्याच्या पत्नीसाठी ग्रँड बेबी शॉवरचे आयोजन केले होते. वत्सल आणि इशिताचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते. इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांनी काही काळ डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्न केले. ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’ या टीव्ही शोमध्ये काम करताना इशिता आणि वत्सल यांची ओळख झाली होती.



‘नागिन’ या मालिकेच्या पाचव्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता वत्सल सेठची या मालिकेत एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षक या मालिकेच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत. नागिन-६ या मालिकेतील तेजस्वी प्रकाशच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तेजस्वीला बिग बॉस-१५ या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

Comments
Add Comment

हिरामणी वाधवा

नक्षत्रांचे देणे :  डॉ. विजया वाड आम्ही उदयाचलने सामने बघत होतो. मी माझ्या छोट्या मैत्रिणीला बरोबर घेऊन गेले

वसुली

क्राइम: अ‍ॅड. रिया करंजकर माणसाचं आयुष्य म्हटलं की त्या आयुष्यासोबत अनेक स्वप्न येतात आणि ती स्वप्न

समर्पण

(जीवनगंध): पूनम राणे वर्गात इतिहासाचा तास चालू होता. गुरुजी गांधीजींच्या चलेजाव आंदोलनाविषयी बोलत होते.

ब्रह्मदेव सृष्टीचे रचनाकार

महाभारतातील मोतीकण: भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने आपल्या छायेपासून तम, मोह, तामिस्त्र, महामोह, अंधतामिश्र अशा

शिल्पातील नृत्यांगना

विशेष: लता गुठे मला नेहमी आकर्षित करणारा विषय म्हणजे पुरातन शिल्पकला. विविध लेण्यांमध्ये जेव्हा जेव्हा भेटते

झेप सूर्याकडे

ओंजळ : पल्लवी अष्टेकर तामिळनाडूच्या एका लहानशा गावात एक छोटी मुलगी आपल्या घराच्या अंगणात आकाशाकडे टक लावून