Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे भगदाड! संपूर्ण नगरपंचायतच शिवसेनेत विलीन

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे भगदाड! संपूर्ण नगरपंचायतच शिवसेनेत विलीन

नाशिक: उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये जबरदस्त धक्का बसला आहे. संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत नाशिकमधील संपूर्ण नगरपंचायतीनेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्याचे या नगरसेवकांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी नाशिकमधील या सहा महत्वाच्या नेत्यांचा आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.

नाशिकमधील सुरगणा नगरपंचायतीतील विद्यमान नगराध्यक्ष भारत वाघमारे, गटनेता सचिन आहेर, नगरसेविका पुष्पा वाघमारे, नगरसेविका अरुणा वाघमारे, नगरसेविका प्रमिला वाघमारे, नगरसेवक भगवान आहेर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही धनुष्यबाण हाती घेतला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश देत भाऊ चौधरी यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

त्याचबरोबर नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे जावळीत शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्याबरोबरच हा राष्ट्रवादीलादेखील मोठा धक्का मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -