Sunday, June 22, 2025

रेल्वे अपघातात २८८ नव्हे तर २७५ जणांचा मृत्यू

रेल्वे अपघातात २८८ नव्हे तर २७५ जणांचा मृत्यू

मृतदेह दोनदा मोजले गेल्याची ओडीशाच्या मुख्य सचिवांची माहिती


बलासोर: ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात २८८ नव्हे तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, काही मृतदेहांची दोनदा मोजणी करण्यात आली होती. अपघातात १ हजार ७५ जण जखमी झाले असून, त्यापैकी ७९३ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताचे कारण सांगितले. ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाला. यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. तसेच रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन व बिझनेस डेव्हलपमेंट सदस्या जया वर्मा यांनी सांगितले की, सिग्नलमध्ये समस्या होती. कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, तेव्हा तिचा वेग ताशी १२८ किमी एवढा होता.


या धडकेनंतर मालगाडी रुळावरून घसरली नाही. कारण मालगाडीत लोखंड भरलेले होते. याचा कोरोमंडल एक्सप्रेसला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. जया वर्मा पुढे म्हणाल्या, रात्री ८ वाजेपर्यंत दोन्ही लाइन्स ठीक होतील. त्यावर हळूवारपणे रेल्वे धावतील.


Comments
Add Comment