Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीचिरंजीवींना कॅन्सर झाल्याच्या केवळ अफवा

चिरंजीवींना कॅन्सर झाल्याच्या केवळ अफवा

खुद्द चिरंजीवी यांनी ट्विट करत दिली माहिती

हैदराबाद : समाजमाध्यमांवर अफवा काही सेकंदात व्हायरल होतात. एखादा सेलिब्रिटी जीवंत असतानाच समाजमाध्यमांवर त्याच्या निधनाची बातमी आल्याने चाहते शहानिशा न करता लगेच श्रद्धांजली वाहायला लागतात. अशीच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीविषयी त्याला कॅन्सर झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र ही गोष्ट चुकीची असल्याची माहिती खुद्द चिरंजीवी यांनी ट्विट करत दिली.

चिरंजीवीने ट्विट केलं आहे की,”गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सर सेंटरचं उद्घाटन करताना मी म्हणालो होतो की, कॅन्सरबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या तर तुमचा बचाव होऊ शकतो. त्यामुळेच मी कोलन स्कोप चाचणी केली. या चाचणीत नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं निदान झालं आणि नंतर ते काढण्यात आलं. त्यावेळी मी एवढचं म्हणालो होतो की,त्यावेळी चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. म्हणूनच प्रत्येकाने सावध राहून चाचणी करुन घेतली पाहिजे”.

त्यांच्या आधीच्या ट्विटबद्दल गैरसमज करुन घेत चुकीची माहिती पसरवल्याने चाहते घाबरले व दुखावले गेले. चिरंजीवी यांच्याबाबत असे समोर आले होते की त्यांना कॅन्सर झाला होता आणि उपचारानंतर कॅन्सर बरा झाला. मात्र या सर्व अफवा असल्याचे चिरंजीवी यांच्या पोस्टमधून स्पष्ट होत आहे. अशी अफवा पसरवणाऱ्यांबाबत त्यांनी संताप व्यक्त केला.

अफवांमुळे माझ्या अनेक हितचिंतकानी मला चांगल्या आरोग्यासाठी मेसेज पाठवले, त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी हे स्पष्टीकरण दिल्याचे चिरंजीवी यांनी म्हटले. तसेच विषय समजून घेतल्याशिवाय मूर्खपणे काहीही लिहू नका असे आवाहन त्यांनी माध्यमांना केले आहे.

चिरंजीवी हे लवकरच ‘भोला शंकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मेहेर रमेश यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा ॲक्शनपट असेल. यामध्ये तमन्ना आणि किर्ती सुरेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -