
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा
भुवनेश्वर: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ११०० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. अशातच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताचा तपास सीबीआयाकडे दिल्याची घोषणा केली आहे.
#WATCH | Railway Board recommends CBI probe related to #OdishaTrainAccident, announces Railways minister Vaishnaw pic.twitter.com/X9qUs55fZr
— ANI (@ANI) June 4, 2023
भुवनेश्वर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघाताची पुढील चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस रेल्वे बोर्डने केली आहे. मुख्य रुळाच्या दुरूस्तीचं काम पूर्ण झालं आहे. विद्युतीकरणांचं काम अद्यापही सुरु आहे. रेल्वे जखमी आणि मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे.
दरम्यान, दोन दिवसानंतर रेल्वे डब्यात अडकलेले सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रुग्णालयात मृतदेहांचे ढीग लागलेले आहेत. शाळा आणि कोल्ड स्टोरेजमध्येही मृतदेह ठेवण्यात आले आहेत.