पुणे : ट्रकखाली सापडल्याने दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघोली-केसनंद रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर दुपारी एकच्या सुमारास घडली. दुचाकीवरील तरुणही जखमी झाला आहे.
गौरवी रवींद्र जाधव ( वय १९, सध्या रा. गुलमोहर सोसायटी, वाघोली, मुळगाव – कोल्हापूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी आशिषकुमार याने पोलिसात फिर्याद दिली असून ट्रक चालक लक्षुमन चीन्नास्वामी (वय ३९, सध्या रा. कोलवडी, ता. हवेली) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषकुमार व गौरवी हे दोघे दुचाकीवरून जात असताना ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने ते दोघे खाली पडले. गौरवी त्याच ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर आशिषकुमार हा जखमी झाला.