Friday, May 9, 2025

क्रीडा

पाकविरुद्धचा कसोटी सामना अखेरचा

पाकविरुद्धचा कसोटी सामना अखेरचा

डेव्हिड वॉर्नरने केली निवृत्तीची घोषणा


सिडनी (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सिडनी येथे घरच्या मैदानावर होणारा कसोटी सामना आपल्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना असेल असे वॉर्नर म्हणाला.


सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर वॉर्नर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना जानेवारी २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तसेच २०२४ चा विश्वचषक माझ्यासाठी शेवटचा असेल असेही वॉर्नरने म्हटले आहे.


"मला धावा करायच्या आहेत. मी नेहमीच सांगितलंय की, २०२४ चा टी-२० विश्वचषक हा माझा अंतिम सामना असेल. मी निश्चितपणे सांगतो की, मी जर आगामी विश्वचषकात धावा केल्या, तर मी ऑस्ट्रेलियात खेळणे सुरू ठेवले तरी, मी वेस्ट इंडिजविरूद्धची मालिका खेळणार नाही", असे डेव्हिड वॉर्नरने शनिवारी सांगितले.

Comments
Add Comment