Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीपत्रकारांसमोर थुंकणार्‍या संजय राऊतांविरोधात दादरमध्ये शिवसेनेचं आंदोलन

पत्रकारांसमोर थुंकणार्‍या संजय राऊतांविरोधात दादरमध्ये शिवसेनेचं आंदोलन

आक्षेपार्ह कृतीबाबत सारवासारव करताना राऊतांची उडाली तारांबळ

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच अतर्क्य विधाने करत असतात. शुक्रवारी श्रीकांत शिंदे यांचं नाव ऐकताच राऊत पत्रकारांसमोर थुंकले. आपल्या आक्षेपार्ह कृतीबाबत सारवासारव करताना राऊत काहीही बरळत सुटले. त्यांनी स्वतःची तुलना थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांशी केली. हे कमी की काय म्हणून विरोध दर्शवण्यासाठी थुंकण्याची क्रिया ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे त्यांनी म्हटले.

संजय राऊत म्हणाले की, “वीर सावरकरांना एकदा न्यायालयात आणण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा एक बेईमान न्यायालयाच्या कोपर्‍यात उभा आहे. सावरकर त्याच्याकडे बघून थुंकले आणि याची इतिहासातही नोंद आहे. तेव्हा बेईमानांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती आहे, हिंदुत्व आहे. मी कोणावर थुंकलेलो नाही मात्र वीर सावरकरांनीदेखील देशाच्या गद्दारांवर न्यायालयात थुंकून संताप व्यक्त केला होता.”

ही अत्यंत असंबद्ध विधाने केल्यानंतर स्वतःच्या कृतीबाबत स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले, “तुम्ही म्हणताय थुंकलो, थुंकलो, पण कुठे थुंकलो दाखवा. मी काल सांगितल्याप्रमाणे माझ्या दाताच्या प्रॉब्लेममुळे व्यक्त झालेली ती कृती आहे. त्यांना असं वाटतं की लोकं आमच्यावर थुंकतायत, हो हे खरंच आहे, पण ते मी कशाला व्यक्त करु?”

या दाताच्या प्रॉब्लेमनंतर संजय राऊतांनी अगदी विरूद्ध विधान केलं, “मी राजकीय नेत्यांची नावं ऐकून नव्हे तर बेईमान्यांची नावे ऐकून थुंकलो. ज्यांनी महाराष्ट्राशी, शिवसेनेशी व ठाकरे कुटुंबाशी बेईमानी केली त्यांची नावे ऐकल्यावर माझी जीभ चावली गेली आणि त्यातून थुंकण्याची प्रतिक्रिया आली.” त्यामुळे राऊत नक्की दाताच्या प्रॉब्लेममुळे थुंकले की जीभ चावल्यामुळे थुंकले की बेईमान्यांची नावं ऐकून थुंकले याबाबत ते स्वतःच संभ्रमात आहेत की काय, असा प्रश्न पडतो.

राऊतांविरोधात शिवसेना आक्रमक

दरम्यान, संजय राऊतांच्या या आक्षेपार्ह कृतीबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. दादर या ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या परिसरातच शिवसेनेने सदा सरवणकरांच्या नेतृत्वाखाली निदर्शने सुरु केली. कार्यकर्त्यांनी राऊतांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. रानडे रोडवर हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -