Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीभारतातील पहिला लिथियम-आयन सेल उत्पादन कारखाना 'येथे' होणार

भारतातील पहिला लिथियम-आयन सेल उत्पादन कारखाना ‘येथे’ होणार

टाटा समूह गुजरातमध्ये १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

१३ हजाराहून अधिक रोजगार उपलब्ध होणार

अहमदाबाद : टाटा समूह गुजरातमध्ये १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि १३ हजाराहून अधिक व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

टाटा समूहाने गुजरात सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे, ज्याअंतर्गत टाटा समूह राज्यात लिथियम आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग गिगा कारखाना उभारणार आहे. टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या अग्रतास एनर्जी स्टोअरेज सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने गुजरात सरकारसोबत हा करार केला आहे.

प्रस्तावित गीगा कारखाना हा भारतातील पहिला लिथियम-आयन सेल उत्पादन कारखाना असेल. पहिल्या टप्प्यात सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह कंपनी येथे निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. या सामंजस्य करारावर अग्रतास एनर्जी स्टोअरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ विजय नेहरा आणि गुजरात सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली आणि देवाणघेवाण केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -