Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Happy Anniversary : बॉलिवूडच्या 'या' गोल्डन जोडप्याचा लग्नाचा आज ५०वा वाढदिवस

Happy Anniversary : बॉलिवूडच्या 'या' गोल्डन जोडप्याचा लग्नाचा आज ५०वा वाढदिवस

सोशल मीडियात गाजतोय, शुभेच्छांचा वर्षाव!


मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय आणि लाडकी जोडी अर्थात महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा आज लग्नाचा ५०वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांची कन्या श्वेता बच्चन आणि नात नव्या यांनी देखिल सोशल मीडियावर काही खास पोस्ट शेअर केल्या आहेत.






 










View this post on Instagram























 

A post shared by S (@shwetabachchan)





श्वेता बच्चनने 'बिग बी’ आणि जया बच्चन यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिने ‘हॅप्पी ५०, आता तुम्ही “गोल्डन” आहात. एकदा माझ्या आईला विचारण्यात आले होते की, सुखी संसाराचे सिक्रेट काय असते? तेव्हा तिने उत्तर दिले, प्रेम. मला वाटते की, माझे वडील, 'पत्नी नेहमीच बरोबर असते, असा विचार करतात', असे तिने यावेळी कॅप्शन लिहिले आहे.


श्वेताची मुलगी नव्याने देखील सोशल मीडियावर अमिताभ आणि जया यांचा एका सिनेमाच्या सेटवर असलेला फोटो शेअर केला आहे.



तसेच बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ’५० वर्ष झाली आहेत. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आदर याबद्दल मी तुमचे आभार मानतो. १९७३ मध्ये जया बच्चन आणि बिग बी यांनी लग्नगाठ बांधली होती. आजही दोघे पूर्वीप्रमाणेच एकमेकांवर प्रेम करतात. या व्यतिरिक्त, प्रत्येक कठीण परिस्थितीत हे दोघेही एकमेकांना पूर्ण पाठींबा देतात. प्रत्येक वेळी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बिग बी सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करतात आणि यावेळीसुद्धा त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. आजच्या या खास दिवशी बिग बींनी आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.


अमिताभ आणि जया यांचे लग्न अचानक झाले होते. ‘जंजीर’ चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते, जया देखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र, वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावे लागले.


खरं तर, लंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जया देखील आहेत, हे जेव्हा हरिवंश राय बच्चन यांना समजले तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचे असेल तर, दोघांनाही आधी लग्न करावे लागेल. याच कारणास्तव, दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी ३ जून १९७३ रोजी एका साध्या घरगुती सोहळ्यात लग्न केले आणि त्याच दिवशी दोघे हनिमूनसाठी थेट लंडनला रवाना झाले होते.

Comments
Add Comment