Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेनचे लॉंचिंग रद्द

गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेनचे लॉंचिंग रद्द
मडगाव : कोकण रेल्वेवरील वंदे भारतला आज म्हणजेच ३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार होते. मात्र आजच्याच दिवशी ओडिशा रेल्वे भीषण अपघाताच्या दुर्घटनेमुळे हे लॉंचिंग रद्द करण्यात आले आहे. या कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मडगाव स्थानकावर येणार होते. मात्र त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ओडिशात शनिवारी सकाळी रेल्वे मंत्री रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. तसेच पंतप्रधान मोदीदेखील बालासोरमध्ये दाखल झाले आहेत.

अपघाताच्या पार्श्वभूमीवर ४८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर ३९ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
Comments
Add Comment