प्रयोगशाळा जळून खाक
पुणे : पुण्यात प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाजवळ एआयएसएसएमएस (AISSMS) कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत प्रयोगशाळा जळून खाक झाली. या आगीत प्रयोगशाळेतील शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले.
शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल झाली. जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत संगणक, फ्रीज, कागदपत्रे, वायरिंग व इतर साहित्य जळाले असून, कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली.