लॉर्ड्सवर कसोटीत तडकावल्या सर्वात जलद १५० धावा
लंडन (वृत्तसंस्था) : क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकत ऐतिहासिक खेळी केली. लॉर्ड्सच्या मैदानात सर्वात जलद कसोटी १५० धावा करण्याची कामगिरी डकेटने केली आहे.
लॉर्ड्सवर डॉन ब्रॅडमन यांनी १९३० मध्ये १६६ चेंडूंत १५० धावा जमवल्या होत्या. ९३ वर्षांपूर्वीच्या या विक्रमाला डकेटने मागे टाकले आहे. डकेटने लॉर्ड्सवरील कसोटी सामन्यात १५० चेंडूंत १५० धावा जमवल्या. त्यामुळे हा विक्रम आता डकेटच्या नावे झाला आहे. या कामगिरीत माजी विस्फोटक फलंदाज केविन पीटरसन तिसऱ्या स्थानी आहे. त्याने १७६ चेंडूंत १५० धावा केल्या होत्या. २००८ मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.
आयर्लंडविरोधातील एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटने ही ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन डकेटने १८२ धावांची शतकी खेळी केली.