Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

डॉ. लहानेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर; नवीन नियुक्तीचे आदेश

डॉ. लहानेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर; नवीन नियुक्तीचे आदेश

मुंबई: डॉ. तात्याराव लहानेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर करण्यात आला असून डॉ. लहाने यांच्या जागी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या तक्रारीनंतर त्यांनी राजीनामा दिला होता.


मुंबईतील प्रसिद्ध जेजे रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे वरिष्ठ प्रमुख डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ रागिणी पारेख यांनी ९ डॉक्टरांसमवेत राजीनामा दिला होता. मार्डच्या निवासी डॉक्टरांनी या वरिष्ठ डॉक्टरांविरोधात नियमभंगाची तक्रार केली होती. या तक्रारीविरोधात चौकशी करत नेत्ररोग चिकत्साविभागानं यावर स्पष्टीकरण दिलं होत. पण यानेही समाधान झालं नसल्यानं मार्डनं संपाचं हत्यार उगारलं. त्यामुळं उद्वीग्न होऊन लहाने, पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.


दरम्यान, आमच्यावर जे आरोप करण्यात आले त्यावर आमचं मत न घेता अहवाल सादर करण्यात आल्याची प्रतिक्रिया डॉ. लहाने यांनी दिली आहे.

Comments
Add Comment