पुणे : आज महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांमध्ये एक करार झाला. या सामंजस्य करारातून पुण्यात बजाज फिनसर्व्ह ही कंपनी जवळपास ५ हजार कोटी गुंतवणार आहे आणि त्यातून ४० हजार नोकर्या निर्माण होतील अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, “नजीकच्या काळातील फिनटेकमधील ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. हळूहळू पुणे हे एक आर्थिक सेवा केंद्र आणि फिनटेकचंही केंद्र बनत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. या गोष्टीला आजच्या या करारामुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी बजाज फिनसर्व्हचे अभिनंदन केले.