Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडी

देशातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द तर १०० रडारवर

देशातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द तर १०० रडारवर

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) देशभरातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हा कठोर निर्णय घेतला आहे. तसेच १०० वैद्यकीय महाविद्यालयांना नोटिसा बजावून त्रुटी दूर करण्यास सांगितल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक प्रणालीवर हजेरी न नोंदवण्यापासून ते कॉलेजच्या सुरक्षा यंत्रणेपर्यंतची बाब समोर आली आहे.


चेन्नईतील सर्वात जुन्या सरकारी वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या स्टॅनले मेडिकल कॉलेज आणि राज्यातील इतर काही वैद्यकीय महाविद्यालयांनी आपली मान्यता गमावल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार ज्या महाविद्यालयांना संलग्नीकरण रद्द करण्यात आले आहे किंवा त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यांच्याकडे बायोमेट्रिक हजेरी प्रणाली होती. कोविड-19 नंतर कर्मचाऱ्यांनी दररोज हजेरी लावणे सुरू केले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमिळनाडू, गुजरात, आसाम, पंजाब, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील अनेक महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Comments
Add Comment