समृद्धी महामार्गावरील वैजापूर टोलच्या ४० कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिने थकीत

  170

कर्मचाऱ्यांचा कामावर हजर होण्यास नकार


वैजापूर: समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावाच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन ते चार महिन्यांचे वेतन थकल्याने कामावर हजर राहण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा टोल प्लाझा काल रात्री बंद होता.


समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावाच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे वेतन दोन तर काहींचे चार महिन्यापासून रखडले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून देण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या सततच्या त्रासाला कंटाळून आणि वेतन मिळत नसल्याने गुरुवारी रात्री ४० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्यास नकार दिला.


यानंतर येथे गाड्यांच्या रांगा लागल्या. शेवटी दुसऱ्या शिफ्टमधील इतर कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले आणि टोल सुरु करण्यात आले. मात्र यासाठी बराच वेळ लागला. विशेष म्हणजे वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याची ही दीड महिन्यातील तिसरी वेळ आहे.


विशेष म्हणजे यासोबतच टोल प्लाझावर जेवण पुरवणाऱ्या आणि चार चाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे देखील बिल थकल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनीही टोल प्लाझा बंद पाडला होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, त्यानंतर देखील एकदा हाच टोल प्लाझा वेतनाच्या मागणीसाठी बंद करण्यात आला. तर आता ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे संबंधित कंपनीचा भोंगळ कारभार सतत समोर येत आहे.

Comments
Add Comment

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने

हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू