Tuesday, July 1, 2025

वंदे भारत ट्रेनचे सिंधुदुर्ग भाजपकडून कणकवलीत होणार भव्य स्वागत

वंदे भारत ट्रेनचे सिंधुदुर्ग भाजपकडून कणकवलीत होणार भव्य स्वागत

माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती


संतोष राऊळ

कणकवली : वंदे भारत ट्रेनची स्वप्नपूर्ती झाली असून ३ जून रोजी वंदे भारत ट्रेन दुपारी साडे बारा वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनचे भव्य स्वागत केले जाणार आहे.


कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदी ३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मडगाव येथे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी वंदे भारत ट्रेन कणकवली स्थानकात दाखल होणार आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे वंदे भारत ट्रेनला थांबा मिळाला आहे. त्याआधी वंदे भारत ट्रेन ला सिंधुदुर्गात थांबा नव्हता. सुपरफास्ट आणि पूर्ण वातानुकूलित असलेल्या या ट्रेन मधून अत्यंत आरामदायी आणि अगदी कमी वेळेत मुंबईहून कोकणात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात या ट्रेन ला थांबा मिळावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवाशातून होत होती.



केंद्रीयमंत्री राणे यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत वंदे भारत ट्रेन ला कणकवलीत थांबा मिळवून घेतला. त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेला वंदे मातरम ट्रेन ने मुंबईला ये जा करणे सहजशक्य होणार आहे. त्यासाठीच कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच ३ जून रोजी धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने दुपारी साडे बारा वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर केले जाणार आहे. यासाठी सिंधुदुर्गवासीय तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment