मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये दहावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी राज्यातून एकूण १५.७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यामध्ये ८४ हजार मुले असून ७३ हजार मुली आहेत.
असा पाहा १०वी चा निकाल…
अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in वर लॉग इन करा…
महाराष्ट्र एसएससी निकाल २०२३ लिंकवर जा.
सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव टाका.
लॉगिन करा आणि तुमचा १० वीचा निकाल तपासा.
या संकेतस्थळावरही निकाल तपासू शकता….
mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच प्रत्येक विषयाचे गुण उपलब्ध होतील.
mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.