उदयनराजे भोसले यांच्यावर सोपवली प्रतापगड प्राधिकरण अध्यक्षपदाची जबाबदारी
महाड : किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी निधी देणार असल्याची मोठी घोषणा केली.
तसेच प्रतापगड प्राधिकरण जाहिर करण्यात आले असून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लंडनमधली भवानी तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सुधीर मुनगंटीवार त्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामध्ये आपल्याला मदत करणार आहेत, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातच ३५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.