Thursday, July 10, 2025

दहावीचा निकाल जाहीर, कोकण अव्वल!

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बोर्डाचा यंदा ९३.८३ टक्के निकाल लागला आहे. या निकालात कोकण विभागाचा निकाल ९८.११ सर्वाधिक टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के जाहीर झाला आहे.


माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत ९५.८७ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर यंदाही कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.


राज्यातून एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यावर्षी २३ हजार शाळांमधून जवळपास ६ हजार ८४४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.



विभागीय निकाल



  • कोकण: ९८.११ टक्के

  • कोल्हापूर: ९६.७३ टक्के

  • पुणे: ९५.६४ टक्के

  • मुंबई: ९३.६६ टक्के

  • छत्रपती संभाजीनगर : ९३.२३ टक्के

  • लातूर: ९२.६७ टक्के

  • अमरावती: ९३.२२ टक्के

  • नाशिक: ९२.२२ टक्के

  • नागपूर: ९२.०५ टक्के

Comments
Add Comment