Saturday, July 20, 2024
Homeदेशअरे रे! आमदार, पाप-पुण्य मोजायला गेले आणि खांबामध्ये अडकले; Video तुफान व्हायरल

अरे रे! आमदार, पाप-पुण्य मोजायला गेले आणि खांबामध्ये अडकले; Video तुफान व्हायरल

रतलाम : मध्य प्रदेशच्या रतलाम ग्रामीणचे आमदार दिलीप मकवाना यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आमदार दिलीप मकवाना मंदिराच्या दोन खांबांमध्ये अडकलेले दिसत आहेत. यावरून आमदारांना सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे. हा व्हिडिओ जवळपास दोन वर्षे जुना असल्याचे म्हटले जात आहे

गुणावदचे शिवशक्ती मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. जेथे या खांबांवरून पाप-पुण्य मोजले जाते. शिवमंदिरात दोन विशाल खांब आहेत, ज्यांना पाप-धर्माचे स्तंभ म्हणतात. दोन खांबांमधील अंतर खूपच कमी आहे. असे मानले जाते की जो या दोन खांबांमधून जातो तो पुण्यवान आत्मा आहे आणि जो जात नाही किंवा अडकतो तो पापी आहे.

आमदार दिलीप मकवाना त्यांच्या सहकाऱ्यांसह मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. येथे पूजा केल्यानंतर त्यांनी खांबाच्या मध्यभागी जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर उपस्थित कोणीतरी त्यांचा व्हिडीओ बनवला. खांबांमध्ये अडकून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदाराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि दावे येत आहेत.

विधानसभा निवडणुका जवळ आल्याने काँग्रेस आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहेत. सोशल मीडियावर नेत्यांचे व्हिडीओ आणि जुनी वक्तव्ये खूप व्हायरल होत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -