LPG Gas Cylinder : व्यावसायिक सिलेंडर ८३.५० रुपयांनी स्वस्त
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ एप्रिल २०२३ रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरचे दर ९१ रुपये ५० पैशांनी कमी केले होते. तर १ मे २०२३ रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत १७२ रुपयांनी कपात करण्यात आली होती.
आज १ जून २०२३ पासून एलपीजी गॅस व्यावसायिक सिलेंडरचे दर ८३.५० रुपयांनी कमी झाले आहेत.
दुसरीकडे, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत, ते जुन्या दरांतच उपलब्ध आहेत. यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कधी कपात होईल, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत १७७३ रुपये पर्यंत खाली आली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरचा दर ११०३ रुपयांवर कायम आहे.