'भाजपकडून सापत्न वागणूक मिळते' असं मी म्हणालोच नाही!

मुंबई : शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकरांनी साधारण आठवडाभरापूर्वी 'भाजपकडून सापत्न वागणूक मिळते', असे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात विरोधी पक्षांकडून प्रतिक्रियांना उधाण आले होते. भाजपवर नेहमीच डोळा ठेवून असणार्‍या पक्षांना हातात आयते कोलित मिळाले होते. मात्र आता कीर्तीकरांनी आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतला आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळते असं मी म्हणालोच नाही, तर तो शब्द माझ्या तोंडी घातला गेला, असे कीर्तीकरांनी स्पष्ट केले.


"भाजपाकडून सापत्न वागणूक मिळते असं मी बोललोच नाही तो शब्द माझ्या तोंडी घातला गेला. आम्ही एनडीएचे घटक पक्ष म्हणून खासदार म्हणून तिथे वावरत होतो. आम्हाला एनडीएच्या घटक पक्षाचा दर्जा नव्हता. एकनाथ शिंदेंनी उठाव केला, त्यानंतर आमची आणि भाजपाची युती झाली आता आम्ही एनडीएचे घटक आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आम्ही खासदार म्हणून भाजपासह गेलो. त्यामुळे आम्ही आता एनडीएचे घटक आहोत हे त्याठिकाणच्या केंद्रीय मंत्र्यांना कळले नाही का? की आम्ही आहोत तिथेच ते समजतात की काय? हा माझा त्यामागचा बोलण्याचा हेतू होता",


मागच्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. त्यामुळे सरकारच्या वर्षपूर्तीच्या आतच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये खटके उडू लागले आहेत का? याच्या चर्चा कीर्तिकरांच्या वक्तव्यामुळे सुरु झाल्या होत्या. मात्र या चर्चा आता कीर्तीकरांनीच खोट्या ठरवल्या आहेत.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा