लंडन (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून जागतिक कसोटी चम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. ज्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे, त्या लंडनमधील ओव्हल मैदानावर दोन्ही संघांचा रेकॉर्ड अतिशय वाईट आहे. भारताला या मैदानावर १४ पैकी केवळ दोनच कसोटी सामने जिंकता आलेले आहेत. ऑस्ट्रेलियाने ३८ पैकी केवळ ७ कसोटी सामन्यांत बाजी मारली.
ओव्हलवर भारताची कामगिरी फारशी चांगली नाही. भारताने या मैदानावर एकूण १४ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी ५० टक्के सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच ७ सामन्यांत कोणताही निकाल लागलेला नाही. उरलेल्या ७ सामन्यांत देखील भारताची कामगिरी खूपच वाईट आहे. भारताने त्यापैकी केवळ २ सामने जिंकले आहेत आणि ५ गमावले आहेत. भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे या मैदानावर टीम इंडियाने शेवटचा सामना जिंकला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या त्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टिम इंडियाने इंग्लंडचा १५७ धावांनी दणदणीत पराभव केला होता. या सामन्यात रोहित शर्माने १२७ धावांची शतकी खेळी केली होती.
भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्डही या मैदानावर खराब आहे. ऑसींनी खेळलेल्या ३८ पैकी केवळ ७ सामन्यांत त्यांना बाजी मारता आलेली आहे. १७ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी १०६ सामने खेळले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने ४४ सामने जिंकले आहेत, तर भारताने ३२ सामने जिंकले आहेत. याशिवाय दोघांमध्ये २९ सामने अनिर्णित राहिले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे.
पावसामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात व्यत्यय आल्यास एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. म्हणजेच ७ ते ११ जून या कालावधीत पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही, तर १२ जून या दिवशी हा सामना पुढे खेळला जाईल. त्यातही निर्णय न झाल्यास आयसीसीतर्फे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…