अमेरिकन ब्रोकरेज कंपनी ‘मॉर्गन स्टॅनली’ने मोदींचे केले विशेष कौतूक, कारण…

Share

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जागतिक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवणार

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): मागील १० वर्षाच्या कार्यकाळात भारतात मोठे बदल झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जागतिक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवण्याकडे वाटचाल करत असल्याचे अमेरिकन ब्रोकरेज कंपनी ‘मॉर्गन स्टॅनली’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. या अहवालानुसार, भारत हा आशिया आणि जगाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे.

‘इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजी अँड इकॉनॉमिक्स: हाऊ इंडिया हॅज ट्रान्सफॉर्म्ड इन लेस दॅन डीकेड’ या शीर्षकाने अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. आगामी दशकभराच्या काळात भारत हा जागतिक विकासातील पाचवा हिस्सा राहणार असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
२०१४ पासून पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रमुख बदलांची यादी करताना, मॉर्गेन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हटले की,

  • भारतातील कॉर्पोरेट कर दर इतर देशांच्या बरोबरीने आणला गेला आहे. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढत आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात सातत्याने वाढ होत आहे.
  • तसेच, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) टक्केवारीनुसार डिजिटल व्यवहार वाढत आहेत, जे अर्थव्यवस्था सुव्यवस्थित होण्याचे लक्षण आहे, असे मॉर्गेन स्टॅनलीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • भारत या दशकाच्या अखेरपर्यंत जागतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असून जीडीपी आणि उत्पादनातील वाढ ही भारताच्या जमेची बाजू असणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • भारताची निर्यात बाजारपेठेतला हिस्सा दुप्पट होणार असल्याचा अंदाज आहे. भारताचा निर्यात बाजार हिस्सा हा २०३१ पर्यंत ४.५ टक्के इतका होण्याची शक्यता आहे. वर्ष २०२१ च्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दोन पट अधिक आहे.
  • भारतात प्रति व्यक्ती उत्पन्न २ हजार २०० डॉलर प्रति वर्ष आहे. प्रति वर्ष उत्पन्न २०३२ मध्ये जवळपास ५ हजार २०० डॉलर प्रति वर्ष इतकं होणार असल्याच अंदाज आहे.

Recent Posts

CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…

13 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

14 hours ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

14 hours ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

14 hours ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

14 hours ago

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

15 hours ago