ऋतुराज गायकवाडने केली भावना व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात टायटन्सविरुद्धचा हंगामातील अंतिम सामना सोमवारी रात्री उशीरा संपला. या सामन्यात दीर्घ निद्रानाशाच्या रात्रीनंतर अखेर १३-१४ तासांची झोप मिळाली असल्याची समाधानाची भावना चेन्नईचा सलामीवीर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने व्यक्त केली. सीएसकेने जेतेपदाचा चषक उंचावल्यानंतर त्याने एक पोस्ट केली. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
ऋतुराज गायकवाड म्हणाला की, दीर्घ निद्रानाशाच्या रात्रीनंतर अखेर १३-१४ तासांची झोप मिळाली असल्याची भावना जागृत झाली. अंतिम सामन्याला एवढा उशीर झाल्यानंतर आणि २ चेंडूत १० धावा करायच्या होत्या यावर विश्वासच बसत नव्हता. पण जडेजाने आमच्यासाठी जबाबदारी स्वीकारली. सर्व चाहत्यांचे आभार… ज्यांनी एवढा उशीर होऊनही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला पाठिंबा दर्शवला”, अशा शब्दांत ऋतुराजने चाहत्यांचे आभार मानले.
सोमवारी रवींद्र जडेजाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयी चौकार लगावून आयपीएलला सोळावा चॅम्पियन दिला. चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्यांना पराभूत करून आयपीएलवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला.