Thursday, September 18, 2025

घरकुल योजनेत एक हजार कोटींचा भ्रष्टाचार!

घरकुल योजनेत एक हजार कोटींचा भ्रष्टाचार!

पंतप्रधान आवास योजना घोटाळ्याप्रकरणी कृषी आयुक्तांना ईडीची नोटीस

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील पंतप्रधान आवास योजना योजनेत एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून या घोटाळा प्रकरणी ईडीने तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.

या घरकुल योजनेत एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने संभाजीनगरमध्ये तब्बल तेरा ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर ईडीन महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली. तत्कालीन महापालिका आयुक्तांची सुद्धा चौकशी केली होती.

त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सुनील चव्हाण कृषी आयुक्त म्हणून कार्यरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा