पुणे : पुण्यात ५ कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. हे अमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जातात.
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने संयुक्त कारवाई केली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
२९ मे रोजी एका वाहनामधून पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर ८५० ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले. याप्रकरणी सखोल तपास करताना पुणे पोलिसांनी लोणावळ्याजवळ आणखी २०० ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले आहेत.
हे अमली पदार्थ कोणाला विकणार होते आणि कुठून आणले होते, याची माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.