Tuesday, January 21, 2025
Homeताज्या घडामोडीसप्तशृंगीच्या दर्शनासाठी ड्रेस कोडला ग्रामस्थांची संमती

सप्तशृंगीच्या दर्शनासाठी ड्रेस कोडला ग्रामस्थांची संमती

ठरावानंतर ट्रस्टला दिले निवेदन

सप्तशृंगी गड : अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आई भगवतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड संहिता लागू करण्याच्या निर्णयाला ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी संमती दर्शवली असून याबाबतचा ठराव येथील ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. ठराव मंजूर केल्यानंतर तशा आशयाचे निवेदन वजा पत्र ग्रामपालिका सदस्यांनी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टला देऊन ड्रेस कोड लागू करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र मंदिर परिषदेने राज्यातील विविध मंदिरांमध्ये वस्र संहिता कार्यान्वित करण्याबाबतचा निर्णय घेतला असून त्यानंतर सप्तशृंगी गडावर ड्रेस कोड लागू होण्याबाबत मत – मतांतरे व्यक्त होत होती. गडावर ड्रेसकोड लागू केल्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तथापि ट्रस्टचे व्यवस्थापक दहातोंडे यांनी या वृत्ताचे खंडण करून तो निर्णय अद्याप झाला नसल्याचे तसेच भारतीय प्रांतांची विविधता लक्षात घेऊन निर्णय होईल असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र आता ग्रामपालिकेने महाराष्ट्र मंदिर परिषदेच्या निर्णयाला पूरक असा ठराव करून ड्रेस कोड लागू करण्याबाबत भूमिका जाहीर केली आहे. या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या पुरुष व महिला भाविकांकडून सप्तशृंगी गडाचे पावित्र्य जपण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात यावा, अशी भूमिका ग्रामपालिकेने घेतली आहे. यासाठी सप्तशृंगी गड ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून मासिक मिटिंग ठराव निवेदन मंदिर प्रशासनाला देण्यात आले आहे.

यावेळी सप्तशृंगी गडाचे सरपंच रमेश पवार,सदस्य संदीप बेनके,कल्पना बर्डे,जयश्री गायकवाड हे निवेदन देताना उपस्थित होते. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येतांना महिला /पुरुषांनी पूर्णांग पेहराव करून यावे, यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने धर्मादाय आयुक्त दरबारी पत्रव्यवहार करावा असे या निवेदनात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -