Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीआपला मानसन्मान गंगेत विसर्जित करण्याचा पैलवानांचा निर्णय

आपला मानसन्मान गंगेत विसर्जित करण्याचा पैलवानांचा निर्णय

महिन्याभरानंतरही तोडगा नाही

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील नामांकित पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलनाचा जोर वाढवला आहे. २३ एप्रिलपासून भडकलेल्या या आंदोलनावर महिन्याभरानंतरही तोडगा न निघाल्याने कुस्तीपटू नाराज झाले आहेत. याच नाराजीतून त्यांचा मानसन्मान असलेली पदकं हरिद्वार येथे गंगा नदीत विसर्जित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. पैलवान विनेश फोगाट तसेच बजरंग पुनिया यांनी समाजमाध्यमांवरुन पोस्ट टाकत यासंबंधीची माहिती दिली.

पैलवानांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले, “आम्ही ही पदके गंगेत विसर्जित करणार आहोत, कारण ती ‘गंगा मां’ आहे. आपण गंगा मातेला जितके पवित्र मानतो, तितक्याच पवित्रतेने आपण कठोर परिश्रम करून ही पदके मिळवली आहेत. ही पदके संपूर्ण देशासाठी पवित्र आहेत आणि पवित्र पदकं ठेवण्याची योग्य जागा फक्त पवित्र माता गंगाच असू शकते.”

युद्धात भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेट स्मारक उभारले आहे. आम्ही त्यांच्याइतके महान नाही परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आमची भावना देखील त्या सैनिकांप्रमाणेच होती. गंगा नदीत पदके विसर्जित केल्यानंतर आमच्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही, त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा पैलवानांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -