Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाIPL 2024शेवटच्या दोन चेंडूंचा निर्णायक थरार

शेवटच्या दोन चेंडूंचा निर्णायक थरार

जडेजाच्या फटक्यांमुळे चेन्नईला विजेतेपद

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नईच्या विजयात अष्टपैलू रवींद्र जडेजाची फटकेबाजी निर्णायक ठरली. चेन्नईने १५ षटके खेळली असली तरी सामन्याचा निर्णय शेवटच्या दोन चेंडूंवरच लागला. शेवटचे दोन्ही चेंडू जडेजाने सीमारेषेबाहेर फेकत संघाला विजेतेपद जिंकून दिले.

रविवारी हा सामना न होऊ शकल्याने अतिरिक्त दिवशी म्हणजे सोमवारी अंतिम सामना खेळविण्यात आला. त्यातही पावसाने खोडा आणला. गुजरातच्या पहिल्या डावानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस मेथडने चेन्नईसमोर १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य देण्यात आले. चेन्नईच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नसली, तरी त्यांच्या फलंदाजांनी कमीत कमी चेंडूंत फटक्यांचा पाऊस पाडला. त्यामुळे सामना रोमांचक वळणावर आला. निर्णायक अशा शेवटच्या दोन चेंडूंवर चेन्नईला १० धावांची आवश्यकता होती. मोहित शर्माचा पहिला चेंडू जडेजाने षटकार लगावला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी ४ धावांची गरज असताना जडेजाने हाही चेंडू सीमारेषेबाहेर फेकत चेन्नईला विजेतेपद जिंकून दिले. जडेजाने ६ चेंडूंत नाबाद १५ धावा केल्या.

गिलला ऑरेंज, तर शमीला पर्पल कॅप

ऑरेंज आणि पर्पल या दोन्ही कॅप गुजरातच्या खेळाडूंनीच पटकवल्या. सलामीवीर शुभमन गिलने हंगामात सर्वाधिक धावा केल्या. त्याने ऑरेंज कॅप जिंकली. हंगामात प्रभावी गोलंदाजी करणारा मोहम्मद शमी पर्पल कॅपचा मानकरी ठरला. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. शुभमन गिलने १७ सामन्यांत ८९० धावा केल्या. मोहम्मद शमीने १७ सामन्यांत सर्वाधिक २८ विकेट घेतल्या आहेत.

चेन्नईला २० कोटींचे इनाम

चेन्नई सुपर किंग्स संघाने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली सलग पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आयपीएल विजेत्या चेन्नईला २० कोटी रुपये बक्षीस म्हणून देऊन गौरविण्यात आले. हार्दिक पंड्याच्या गुजरात संघालाही अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर मोठी रक्कम बक्षिस म्हणून मिळाली. उपविजेत्या गुजरात टायटन्सला १३ कोटी रुपये मिळाले.

चेन्नईला पाचव्यांदा विजेतेपद

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये पाचव्यांदा जेतेपदाचा चषक उंचावत मुंबई इंडियन्सच्या ५ वेळच्या विजेतेपदाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा ही कामगिरी केली. आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या गुजरात जायंट्सचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात संघाने २१४ धावा ठोकल्या होत्या. मात्र पावसामुळे चेन्नईला विजयासाठी १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. चेन्नईने शेवटच्या चेंडूवर हा सामना जिंकला.

आयपीएलच्या इतिहासात २५० सामने खेळणारा धोनी पहिला खेळाडू

महेंद्र सिंह धोनीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात मैदानावर प्रवेश करताच एक मोठा विक्रम रचला आहे. महेंद्र सिंह धोनी आयपीएलच्या इतिहासात २५० सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही. धोनीनंतर रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक खेळणारा खेळाडू आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये २४३ सामने खेळले आहेत. धोनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून २२० सामने खेळले आहेत. त्याशिवाय त्याने रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून ३० सामने खेळले आहेत.

साईची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी

गुजरातच्या साई सुदर्शनने चेन्नईच्या गोलंदाजांना धु धु धुवत ४७ चेंडूंत ९६ धावांची फटकेबाजी केली. या खेळीत आठ चौकार आणि सहा षटकार लगावले. आयपीएलच्या इतिहासातील अनकॅप्ड खेळाडूने म्हणजेच एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या खेळाडून केलेली ही सर्वाधिक धावांची खेळी आहे. चेन्नईच्या संघाने शुभमन गिलसाठी तयारी केली होती. गिल लवकर बाद झाला. मात्र साई सुदर्शनच्या फटकेबाजीमुळे गुजरातला २० षटकांत २१४ धावांपर्यंत मजल मारता आली. आला, अशी परिस्थिती अंतिम सामन्यात पाहायला मिळाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -