भिवंडीत मुसळधार पावसाची हजेरी
भिवंडी: तालुक्यातील पडघा, बोरीवली परिसरात दुपारच्या सुमारास वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने पावसाच्या चार महिन्यांसाठी साठवून ठेवले अन्न-धान्य पाण्याने भिजले आहे.
दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे एका हॉलवरील छप्पर अंगावर पडून लग्नातील वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना घडली आहे.