फडणवीस व राज ठाकरेंच्या भेटीने चर्चांना उधाण

  155

या भेटीत कोणत्या गप्पा झाल्या?


मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रात्री उशीरा भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


या रात्रीच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट अराजकीय गप्पा मारण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली असली तरी या दोघांमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.


गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी भाजपने घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती. त्यामुळे काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसून येत आहे. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर टीका देखील केली होती. यानंतर भाजप आणि राज ठाकरे यांच्यात बिनसल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.


त्याआधी आगामी मुंबई महानगरपलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, राज ठाकरेंनी भाजपच्या काही भूमिकांना विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस राज ठाकरे यांच्यातील या भेटीला महत्व आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता