प्रदीप पाटील, भाजपप्रणीत संघजन, प्रतिष्ठान, ज्येष्ठ सदस्य
‘सबका साथ सबका विकास ’ हे ध्येय समोर ठेवून २६ मे २०१४ रोजी भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीनी शपथ घेतली व सरकारने सर्वंकश आणि सर्व समावेशक विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरु केली आहे. हे सरकार अंत्योदय अर्थात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवून त्याचा विकास करण्याच्या तत्त्वाने सर्वाधिक प्रेरित आहे. गेल्या ९ वर्षांत मोदी सरकारने अभुतपूर्व यश मिळविलेले आहे.
३० मे २०२३ ते ३० जून २०२३ ह्या कालावधीत भाजप ‘महा जनसंपर्क अभियान’ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे नेतृत्वात देशभर लोकसभा मतदार संघात विशेष जनसंपर्क अभियान म्हणून राबविणार आहेत. भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात सन २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. नरेंद्र मोदी यांचे यांचे सरकारची ३० मे २०२३ रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत.
‘सबका साथ सबका विकास’ या उमेदीने सुरू झालेला प्रवास विकसित भारतासाठी कार्यरत आहे. गेल्या ९ वर्षांत सरकारने भांडवली खर्चावर व मूलभूत सुविधांवर ३४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातही भांडवली खर्चासाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या रकमेमुळे नवीन महामार्ग, नवीन विमानतळे, नवीन रेल्वेमार्ग, पुल इत्यादी आधुनिक पायाभुत सुविधा निर्माण होत आहेत. देशात अनेक रोजगार निर्माण होत आहेत.
मागील ९ वर्षांत भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. कोरोना व्हायरस महामारीच्या काळात देखील सरकारी अॅपने लोकांपर्यंत माहिती पोहाेचविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारताच्या राष्ट्रीय कोविड सर्वेक्षणानुसार भारताने ६ जाने. २०२३ पर्यंत देशात २२० कोटींपेक्षा जास्त कोविड लस मात्रा (डोस) दिले आहेत. तिहेरी तलाक कलम ३७०, जीएसटी कायदा, नोटा बंदी असे महत्वपूर्ण निर्णय घेतलेत त्यांचे श्रेय मोदी सरकारलाच जाते. या शिवाय अनेक विकास योजना व उल्लेखनीय अशी कामे सरकारने सुरु केली. त्याचा फायदा देशातील नागरिकांना झाला. मुद्रा योजनेमुळे लोकांना कमी दरात कर्ज मिळत आहे. तसेच उज्वला योजनेमुळे महिलांना सिलिंडर मिळत आहे.
मोदी सरकारने ९ वर्षांच्या कालावधीत अनेक उल्लेखनीय कार्य व विकास योजना केल्या.
१) ३७० कलम.
२) राममंदिर.
३) नोटाबंदी.
४) प्रत्येक नागरिकाचे बँक
बचत खाते.
५) डीजीटायझेशन.
६) कोरोना काळात भारताने स्वबळावर लस निर्मिती केली.
७) कोरोनामध्ये भारतीय नागरिकांचे रेकाॕर्डब्रेक लसीकरण केले.
८) बाहेरील देशांना लसींचा पुरवठा केला.
९) अखाती देशातून तसेच युक्रेन अफगणिस्तानमधून युद्धकाळात भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणले.
१०) सर्जिकल स्ट्राईक केले.
११) चायना बॉर्डरवर अद्यावत दळणवळण व्यवस्था केली.
१२) गरिबांना फ्री गॅस कनेक्शन.
१३) गरिबांना घरकुल योजना.
१४) जलवाहतूक सुरु केली.
१५) रेल्वेमध्ये अद्यावत सुधारणा. प्रवासादरम्यान एका ट्वीटद्वारे मदत मिळू शकते. वंदे भारत ट्रेन.
१६) देशात विमान तळांचे जाळे वाढवले.
१७) एम्स हॉस्पिटल उभारणी
१८) नानक न्व्हेन्शनल ऊर्जा स्त्रोत. जसे सोलर पावर.
१९) जीएसटी कर प्रणाली.
२०) जी ट्वेंटी अध्यक्ष पद.
२१) मन की बातद्वारे करोडो लोकांशी जोडणे.
२२) चंद्रावर स्वारी.
२३) अद्यावत सोयींनीयुक्त लष्कर.
२४) सॅटेलाईट क्षेत्रातील भरारी.
२५) मेक ईन इंडिया ड्राईव्ह.
२६) स्वच्छ भारत अभियान.
२७) युक्रेन युद्धकाळात रशियाकडून कच्चे तेल घेऊन ते रिफाईन करुन युरोपीय देशांना विकले.
२८) भारताची अर्थव्यवस्था सुधारली.
२९) किसान सन्मान निधी.
३०) आयुष्यमान भारत.
३१) प्रधानमंत्री आवास योजना.
३२) विमा योजना.
३३) पंतप्रधान मंत्री.
जनधन योजना.
३४) गरीब कल्याण योजना.
३५) वंदे भारत एक्सप्रेस इत्यादी
गेल्या १० वर्षे पुर्वी अमेरिका सारख्या बलाढ्य राष्ट्राने मोदींना व्हिसा नाकारला होता. त्याच मोदींनी परराष्ट्र धोरणाची दिशा ठरविली. जगातील प्रत्येक भारतीयांची अभिमानाने उंचावलेली मान मोदी सरकारच्या परराष्ट्रीय धोरणाचे प्रशंसनीय असे यश आहे. त्यामुळेच मोदींची गणना जागतिक नेतृत्वात केली गेली. मागील ९ वर्षांतील भारताचे परराष्ट्र धोरण गेल्या अनेक दशकांच्या कामगिरी पेक्षा सरस झालेले आहे.
हे मान्य करावे लागेल. भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्याही दबावाविना स्वायत्तपणे काम करीते. हा संदेश जगाला आपल्या कृतीतून दाखवून दिला. जगातील अनेक गरीब राष्ट्रे लशीच्या उपलब्धतेपासून वंचित होती. भारताने व्हॅक्सीन डिप्लोमसी चा कार्यक्रम स्विकारला. जगातील तब्बल ६९ राष्ट्रांना ५८३ लाख कोविड राशीचे डोस मोफत वितरीत केले भारताच्या ह्या प्रयत्नांची जगभर प्रशंसा केली गेली. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारताचे हे धोरणात्मक यश असल्याचे मान्य केले आणि भारताची व्हॅक्सीन डिप्लोमसी यशस्वी झाल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात सामान्य माणूस केंद्रबिंदू असेल असे ठरवून महाराष्ट्र राज्य विकास पर्वावर जाईल याची ग्वाही महाराष्ट्र राज्य सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात दिली आहे. गेल्या १० महिन्यांत राज्य सरकारने विकासाची व कल्याणकारी अनेक कामे केली आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र राज्याची प्रगती नक्कीच वैभवशाली आहे. जगासाठी दीपस्तंभ बनविण्याच्या विश्वासापोटी भारतीय नागरिकांनी मोदींना जनादेश दिला आहे.
पुढील वर्षी मे २०२४ देशातील लोकसभा निवडणुकीत हाच जनादेश मोदी सरकारला नागरिकांकडून पुनश्च मिळेलच. तसेच भारत जगामध्ये एक बलशाली हिंदू राष्ट्रनिर्मित व्हावा ही इच्छा!