Friday, October 11, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशेतकऱ्यांसाठी खूशखबर! फक्त १ रुपयात पीक विमा योजना

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! फक्त १ रुपयात पीक विमा योजना

शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी निर्णय

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने एक महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना केवळ १ रुपयांत पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. शिवसेना-भाजपा सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार आहे. त्याचसोबतच सरकार पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार आहे.

वाचा आजच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

  • कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता.
  • ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यातही राबविणार.
  • सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. २२.१८ कोटी खर्चास मान्यता
  • महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राज्याला
  • माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार.
  • कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार.
  • सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट.
  • अधिनियमात सुधारणा करणार बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार.
  • अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत
  • प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती करणार नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -