
नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाला सरकारकडून दाद देण्यात येत नसल्याने उद्वीग्न झालेल्या कुस्तीपटूंनी आपली ऑलिम्पिकची पदके हरिद्वार इथे गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. पण अखेर त्यांनी यातून माघार घेतली आहे. त्यांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश आले आहे. पण त्याचे आंदोलन अद्याप संपलेले नसून बुधवारी इंडिया गेटवर आंदोलनाची त्यांनी हाक दिली आहे.