‘मातोश्री २’ मध्ये इंटेरिअरसाठी २५० कोटी रुपयांचा खर्च
मुंबई : नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी संसदेची इमारत स्वतःसाठी नाही बांधली. देशासाठीच बांधली आहे. पण एक ‘मातोश्री’ असताना ‘मातोश्री २’ महल बांधला आणि त्याच्या इंटेरिअरसाठी २५० कोटी रुपयांचा काळा पैसा खर्च केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन करावी असा प्रस्ताव गेला असल्याचा खळबळजनक दावाही आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक ठाकरेंचे आमदार घड्याळ चिन्हावर लढविणार आहेत आणि त्याची तयारी संजय राऊत यांनी केल्याचे राणेंनी म्हटले आहे.