Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणपर्यटकांनी बहरले काशिद बीच

पर्यटकांनी बहरले काशिद बीच

‘मे’ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अलोट गर्दी; रस्त्यावर वाहनांची कोंडी

मुरूड : मुरूडमधील काशिद बीचवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटकांची अलोट गर्दी उसळलेली पहायला मिळत आहे. रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा तर नांदगाव बाजारपेठेत वाहनांची कोंडी झाली होती. पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला.

काशिद-बिच हे मुरूड तालुक्यातील एक रमणीय स्थळ आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा, भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांसाठी येथे स्पीडबोट, पॅरेसेलिंगबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील उपलब्ध आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येथील स्पिडबोट बंद करण्यात आल्या आहेत. कारण पावसाळा सुरू होण्याआधी समुद्राला उधाण येते. याठिकाणी खाद्यपदार्थंची रेलचेल आहे. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रॅफिक जॅमलाही सामोरे जावे लागते.

स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा!

पांढरी वाळू, निळाशार समुद्रकिनारा, हिरवी पर्वतराजी ही काशीद बीचची वैशिष्ट्ये. दोन टेकड्यांदरम्यानच्या तीन किलोमीटर लांबीच्या या बीचचे पाणी स्वच्छ आहे. पर्यटकांची गजबज असली, तरीही हा समुद्रकिनारा शांत असतो. अलिबागला येणारे जास्तीत जास्त पर्यटक काशीद बीचला भेट देतात. हा बीच गोव्या इतकाच सुंदर आहे. मॉन्सूनव्यतिरिक्तच्या काळात या बीचवर पाचसहा फुटांपर्यंतच्या लाटा उसळतात. पुरेशी सावधगिरी न बाळगता सर्फिंग करू नये. गाईड किंवा स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवास सर्फिंगचे धाडस करू नये. पावसाळ्यात येथील समुद्रकिनारा खवळलेला असतो. कोकणातील मासे व इतर पारंपरिक पदार्थांचा घरगुती आस्वाद घेता येतो. मुंबईबरोबरच पुण्यापासूनही तो जवळ आहे. या बीचपासून मुरुड जंजिरा किल्ला जवळच असून तुम्ही त्यालाही भेट देऊ शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -