Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

ठाण्यात पार पडलं कुत्र्याचं वर्षश्राद्ध!

ठाण्यात पार पडलं कुत्र्याचं वर्षश्राद्ध!

ठाणे : काहीजण आपल्या पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम करतात. त्यांना आपल्या कुटुंबातील एक सदस्य असल्यासारखी वागणूक देतात. अशाच एका पाळीव कुत्र्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबाने आपल्या निधन झालेल्या पोमेलियन कुत्र्याचे वर्षश्राद्ध घालून पाळीव कुत्र्यावर असलेल्या प्रेमाची परतफेड केली आहे. हिंदू धर्मात श्राद्ध विधीला विशेष महत्त्व असून, श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी जो पितरांना समाधान देतो, अशी श्रद्धा आहे.

ठाण्याच्या खोपट येथील दर्शन टॉवरमध्ये राहणाऱ्या किरण जाधव यांच्या घरी असलेल्या पोमेलियन कुत्र्याचं रविवारी वर्षश्राद्ध ठाण्याच्या कोपनेश्वर मंदिरामध्ये करण्यात आले़ किरण जाधव यांचा मुलगा केतन यांनी हे कार्य आज केले़ गुरुजी सचिन कुलकर्णी यांनी विधी पार पाडले. सदर कुत्र्याचं निधन गेल्यावर्षी २८ मे ला झाले होते. त्यावेळी माणसाप्रमाणे त्याचे विधी करण्यात आले होते़ सदर कुत्र्याचे नाव शीरो असून हा गेले पंधरा वर्षे त्यांच्या घरामध्ये होता आणि त्याला मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळले होते. ठाण्यात कुत्र्याचे वर्षश्राद्ध घातल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा