मुंबई : कांदिवली येथे एका ३२ वर्षीय टँकर व्यावसायिकाची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली. कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याची बाब समोर येत आहे. या घटनेत गोळी लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर मारेकरी तत्काळ घटनास्थळावरून पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण या परिसरात टँकरने पाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. याच व्यवसायाच्या वर्चस्व वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. टँकर व्यवसायावर वर्चस्व राखण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे समजते. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस छापेमारी करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास
सुरू आहे.
गोळीबाराच्या घटनेमुळे कांदिवली लालजी पाडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे कांदिवली लालजी पाडा परिसरात मागील सहा ते सात महिन्यांतील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. याआधी १ ऑक्टोबर २०२२ रोजी गोळीबाराची घटना घडली होती. ऑक्टोबर महिन्यात कांदिवली पश्चिमेतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. परिसरात मध्यरात्री अचानक गोळीबार करण्यात आला. तब्बल चार राउंड फायरिंग झाली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते.