तळहाताला खाज येणे ही खूप सामान्य तक्रार आहे. काही लोकांची तर अशी श्रद्धा असते की, तळहात खाजवले तर धनप्राप्ती होते व त्यामुळे ते याला चांगले लक्षण मानतात. मुखतः हा आजार काही आनुवांशिक कारणे व वातावरणातील बदलांमुळे होतो. त्वचेच्या बरेच समस्यांपैकी ही देखील एक समस्या मानली जाते. सर्वांच्या त्वचेवर एक प्रोटेक्टिव कवरिंग असते, ज्यामध्ये मॉइस्च्यूरायसिंग घटक असतात, जे आपल्या त्वचेला नेहमी मऊ ठेवतात. ज्याला बैरियर फंक्शन असे म्हणतात; परंतु एक्जिमामध्ये हेच कव्हरिंग नष्ट होते व त्वचा कोरडी पडते. याच त्वचा विकाराबद्दल आपण आजच्या अंकात जाणून घेणार आहोत.
हा त्वचा रोग व्यावसायिक आणि नियमित घरघुती उपक्रमाशी संबंधित आहे आणि म्हणून गृहिणींमध्ये बघायला मिळतो, याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत :
१. इसब हा काही बाहेरील कारणामुळे तसेच काही अंतर्जित कारणांमुळे होतो. बाहेरील कारणांपैकी मुख्य कारण म्हणजे रासायनिकाच्या संपर्कात आल्यामुळे जसे की, साबण, डीटरजेंट्स, रबर, पालेभाज्या वगैरे.
२. व्यावसायिक कारणापैकी सीमेंट, ग्रीज कामगार, तसेच पेंटर ज्यांचा संबंध वेगवेगळ्या रंगासोबत होतो, त्यांना एक्जिमाचा त्रास होतो. जर हाताला किरकोळ इजा असतील किंवा तळहात दीर्घकाळ अतिकोरडे असतील तरीही याचा त्रास चिरकाळ होत असतो.
३. अंतर्गत कारणांपैकी अटोपी म्हणजे त्वचा मऊ ठेवणारे घटक जन्मापासूनच कमी असतात. हे हाताच्या एक्जिमासाठी कारणीभूत असे महत्वाचे कारण आहे. मानसिक तणाव, हॉर्मोन्स, व त्वचेचे अति कोरडेपण इसबसाठी मानले जातात.
४. काही लोकांना काही घटकांची अॅलर्जी असते, जसे : निकेल (nickel), निओमायसिन (neomycin), मेर्काप्तोबेंझथिओझोल (mercaptobenzthiozole), कोलोफोनी (colophony), फ्रागरन्स मिक्स (fragrans mix), कोबाल्ट (cobalt) इत्यादी प्रतिजनांच्या संपर्कामुळे हँड एक्जिमा उद्भवू शकतो.
पुरुषांमध्ये पोटॅशियम डायक्रोमेट (potassium dichromate) जे डिटरजेंट्स व सिमेंटमध्ये असते. याची जास्त रिअॅक्शन होते, तर महिलांमध्ये निकेल जे कृत्रिम दागिन्यांमध्ये असते. याची अॅलर्जी
पाहायला मिळते.
५. जे लोक शेतामधील किंवा घरा शेजारील गाजरगवताच्या (Congress/parthenium) संपर्कात येतात, त्यांना याची अॅलर्जी दिसून येते. गाजरगवत हे एक प्रकाश संवेदनशील झाड असल्यामुळे ज्यांना याची अॅलर्जी होते, त्या रुग्णांना हात, पाय तसेच शरीरावर लाल रंगाचे चट्टे येतात, खूप खाज सुटते, तळहात व तळपायावर भेगा पडतात, हाता-पायावर सुज येते व काही वेळेस तर शरीराचा ९० टक्के भागावर याची रिअॅक्शन दिसून येते. अशावेळी, त्वचा रोग तज्ज्ञांकडून वेळीच मार्गदर्शन घेणे उपयोगी ठरते.
६. गृहिणींमध्ये लसूण, कांदा, आले, भेंडी, टोमॅटो इत्यादी भाज्यांची रिअॅक्शन होऊन हाताची चामडी निघणे, आग होणे, भेगा पडणे, खाज सुटणे, असा त्रास होऊ शकतो.
७. माळी जे दररोज वेगवेगळ्या झाडांशी संपर्कात येतात, कीटकनाशकांशी त्यांचा संबंध येतो. त्यांच्या बोटाच्या टोकांवरची चामडी निघून तिथे खाज सुटते व भेगा पडतात.
८. ज्यांचे हात सतत ओले असतात जसे की, घरगुती कामे करणाऱ्या बायका व ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होऊन त्यांचा एक्जिमाचा त्रास वाढू शकतो.
१. एक्जिमाच्या निदानासाठी त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला फायदेशीर ठरतो. ते रुग्णाला तपासून एक्जिमासारखे नक्कल करणारे दुसरे आजार ओळखून एक्जिमाचा योग्य तो उपचार सांगू शकतात.
२. काही एक्जिमांच्या निदानासाठी त्वचा रोग तज्ज्ञ तुम्हाला पॅच टेस्ट (patch test) सूचित करू शकतात. ज्यामध्ये तुमच्या पाठीवर विशिष्ट प्रकारचे प्रतिजन लावतात व ७ दिवसानंतर ते तुम्हाला निदानासाठी बोलावतात. एलर्जिक कांटेक्ट डर्मेटाइटिस (allergic contact dermatitis) च्या निदानासाठी ही तपासणी खुप उपयुक्त ठरते.
१. हैण्ड एक्जिमा मधे त्वचेतिल बैरियर फंक्शन (barrier function) नष्ट झाल्यामुळे जे हातांचे कोरडेपण उरते त्यासाठी बैरियर रिपेयर क्रीम्स ज्यामधे सेरामइड (ceramides), कोलेस्ट्रॉल एस्टर (cholesterol esters) तसेच ओट (oat) असलेले मोइस्चरायझर खुप उपयोगी ठरतात. हे क्रिम्स दिवसातून ५-६ वेळेस वापरावे.
२. ज्या लोकांना एखाद्या केमिकल, भाजी, किंवा धातूची अॅलर्जी झाली आहे, त्या लोकांनी अॅलर्जी असलेल्या वस्तूपासून नेहमीसाठी दूर राहावे. महिलांनी ओले काम करण्याआधी बोटातील अंगठी काढून ठेवावी.
३. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी हात धुण्याकरिता कोमट पाणी व सौम्य साबणाचा वापर करावा. लगेच हात कोरडे करावेत. मुखतः दोन बोटांमधील त्वचा नीट पुसून घ्यावी व लगेच मॉइश्चरायझर क्रिम्सचा
वापर करावा.
४. वारंवार त्वचा टॉवेलने घासणे टाळावे व कपडे धुण्याच्या साबणाचा वापर कमी करावा. यामुळे त्वचा जास्त कोरडी पडते व फाटते.
५. ज्यांना रबर किंवा लेटेक्स मोज्यांची अॅलर्जी आहे, त्यांनी ते मोजे घालणे नेहमीकरिता टाळले पाहिजेत. सोबतच
दोन्ही तळव्यांना भरपूर मॉइश्चरायझर लावून त्यावर सूती मोजे घालावेत.
६. हा त्रास खूप चिरकाळ असेल, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला फोटोथेरपी सुचवू शकतात.
एक्जिमा/इसब हा आजार जुनाट परंतु खूप सामान्य जरी असला तरी त्यामुळे रुग्णची दिनचर्या विस्कळीत होते. त्यामुळे वेळीच त्वचारोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन याचा योग्य तो उपचार केला, तर याचा त्रास कमी करता येऊ शकतो.
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…
उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…