नागपूर : मंदिरात देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कसे कपडे घालावेत, यावर गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धंतोलीतील गोपालकृष्ण मंदिर, बेलोरीतील (सावनेर) श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, कानोलीबाराचे श्री बृहस्पती मंदिर आणि मानवता नगरातील श्री हिलटॉप दुर्गामाता मंदिर या देवालयांनी वस्त्रसंहिता जारी केली आहे. त्यानुसार या चारही मंदिरांमध्ये अंगप्रदर्शन करणाऱ्या उत्तेजक तथा तोकड्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने सन २०२०मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत वस्त्रसंहिता लागू केली आहे.
नागपूरमधील चार मंदिरांत ड्रेसकोड
जाणून घ्या कोणत्या कपड्यांवर आहे बंदी
